नवी दिल्ली – एका बाजूला बेलरस सीमेवर युक्रेनशी चर्चा सुरू असतानाच रशियाने आपल्या आक्रमाणाची धार वाढवत असल्याचे नेमके विरोधाभासी चित्र समोर येत आहे. राजधानी किव्हच्या दिशेने जाणाऱ्या लष्करी वाहनांचा मैलोन् मैल ताफा उपग्रहावरून टीपलेल्या छायाचित्रातून दिसत आहे.
Now that it is clear that what Russia has done in Ukraine violates BRICS Resolution in Delhi Declaration of last year. Will Modi have the guts to tell Putin to back off?
— Subramanian Swamy (@Swamy39) March 1, 2022
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा आजचा पाचवा दिवस आहे. रशियाने पूर्ण शक्ती पणाला लावूनही महत्वाच्या शहरांवर ताबा मिळवता आला नाही. त्यांना अनपेक्षित अशा कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. यावरून आता भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे की,’मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केलाय. त्यांनी ट्विट केली आहे की,’मागील वर्षी ब्रिक्स देशांनी मागील वर्षी मंजूर केलेल्या दिल्ली कराराचं रशियाने उल्लंघन केलं. यामुळे आता पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का?”, असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी ट्विटर करत विचारला आहे.