प्रभासच्या आगामी “आदिपुरुष’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखालील या चित्रपटात प्रभास हा राम आणि सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेत झळकणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात नुकतीच कृति सेनन आणि सनी सिंह यांनाही कास्ट करण्यात आले आहे. यात कृति ही सीता, तर सनी सिंह हा लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. प्रभासच्या या मेगा बजेट पॅन इंडिया चित्रपटात आता आणखी एका आघाडीच्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.
View this post on Instagram
“आदिपुरुष’मध्ये लवकरच काजोल झळकणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारू शकते.
View this post on Instagram
–
यासाठी स्वतः प्रभासने काजोलच्या नावाची शिफारस केली आहे; परंतु काजोलच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टपणे दुजोरा देण्यात आलेला नाही.
View this post on Instagram
दरम्यान, प्रभास हा बॉलीवूडमधील अभिनेत्रींचा चाहता आहे. यासाठीच त्याने आपल्या अन्य एका चित्रपटात “राधे श्याम’मध्ये अभिनेत्री भाग्यश्रीला पसंती दिली होती. आता या चित्रपटासाठी त्याने काजोलचे नाव सुचविले आहे. या चित्रपटात प्रभाससोबत काम करण्यासाठी काजोल उत्साहित आहे. परंतु याला काजोलने अद्याप पुष्टी दिलेली नाही.