मराठमोळी अभिनेत्री श्रीया पिळगावकर सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. अशातच तिच्या हटके अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
श्रीया ही अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे. श्रीयाने “एकुलती एक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र, श्रीया फक्त मराठी चित्रपटांसाठी मर्यादित न राहता हिंदी, मराठी, तेलुगु अशा फ्रेंच अशा निरनिराळ्या भाषेत तिने काम केले आहे.
View this post on Instagram
श्रीयाने आपल्या विविध भूमिकांनी आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. तसेच “हाउस अरेस्ट’ या चित्रपटातसुद्धा श्रीया झळकली आहे. त्याचबरोबर तिने “जय माता दी’ सारख्या लघुपटातसुद्धा काम केले आहे. हिंदीमध्ये किंग खान शाहरुख सोबत “फन’ या चित्रपटात ती झळकली होती.
View this post on Instagram
श्रीया सध्या ओटीटीवर सुद्धा काम करत आहे. श्रीयाने निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनसुद्धा काम केले आहे. तिने “द पेंटेड सिग्नल’, “ड्रेसवाला’ यांसारख्या लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती आगामी काळात “हाथी मेरे साथी’ या चित्रपटात झळकणार आहे. यात राणा दुग्गुबतीसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे.