मुंबई – अभिनेता यशचा बहुचर्चीत KGF 2 रिलीज झाल्यापासून हा चित्रपट खूप गाजत आहे. आतापर्यंत हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धमाका करत आहे. कमाईच्या बाबतीत KGF 2 रोज नवा विक्रम करत आहे. चित्रपटाचे दोन्ही भाग प्रचंड यशस्वी झाले आहेत, त्यामुळे आता KGF 3 ची तयारी सुरू आहे. दरम्यान, बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन यशसोबत KGF 3 मध्ये दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे.
अभिनेता हृतिक रोशन खरोखरच KGF 3 चा भाग होणार आहे का असा सर्वानांच प्रश्न पडला आहे. खरंतर या चित्रपटावर काम सुरू असल्याची बातमी आहे. या चित्रपटाशी निगडीत लोकांचे मानायचे झाले तर, चित्रपटाचे दिग्दर्शक सध्या त्यांच्या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट सालारमध्ये व्यस्त आहे. ते पूर्ण होताच, त्यानंतर केजीएफच्या तिसऱ्या भागाचे काम सुरू केले जाईल. त्यानंतरच चित्रपटाची कास्टिंग फायनल होईल. पण मीडिया रिपोर्ट्सवररून, आतमध्ये चित्रपटाच्या कास्टिंगवर काम सुरू झाले आहे आणि यावेळी यशसोबत हृतिक रोशनला कास्ट करण्याचा विचार सुरू आहे.
दरम्यान, हृतिक रोशनने याआधी साऊथमधील सुपरहिट चित्रपट बाहुबलीची मुख्य भूमिका नाकारली आहे, हृतिकला सर्वप्रथम एसएस राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला, त्यानंतर साऊथ स्टार प्रभासने ही भूमिका पार पाडली.