बॉलिवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानचा “झिरो’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा त्याचा रोमांस पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहे. मात्र, एकामागून एक अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खानने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मध्ये शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. “झिरो’नेही बॉक्स ऑफिसवर धमाल करू शकला नाही.
त्याआधी शाहरुख आलिया भट्टसोबत “डियर जिंदगी’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता आणि समीक्षकांकडूनही त्याचे कौतुक झाले होते. शाहरुखच्या पुढच्या प्रोजेक्टबाबत आतापर्यंत बऱ्याच बातम्या आल्या आहेत. पण किंग खानने आपल्या चाहत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा तो पुढचा चित्रपट करेल तेव्हा तो स्वत: त्याची घोषणा करेल. आता किंग ऑफ रोमांस लवकरच पुन्हा एकदा आलिया भट्टसोबत काम करताना दिसणार आहे.
शाहरुख खान आणि आलिया भट्ट लवकरच सिद्धार्थ आनंदच्या चित्रपटात एकत्रीत झळकणार आहेत. मात्र? चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. यापूर्वी सिद्धार्थ आनंदचा “वॉर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात टायगर श्रॉफ, हृतिक रोशन आणि वाणी कपूर यांनी काम केले होते. आता तो शाहरुख आणि आलियाला पुढच्या चित्रपटासाठी कास्ट करणार आहे.