पुणे – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे आता देशातील सर्वच नागरिक आपल्या घरी बसून आहे.
दरम्यान, अशा परिस्थिती मराठी संगीतकार आणि गायक ‘आनंद शिंदे’ यांनी कोरोना व्हायरसवर एक सुंदर गाणं तयार केलं आहे. ‘बांधवांनो घराबाहेर पडू नका’ असं आनंद शिंदे या गाण्यातून सांगत आहे. सध्या कोरोना वरील हे गाणं लोकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. त्यामुळे तुम्हीही एकदा हे गाणं बघाच!