मुंबई – लॉकडाउन उठविल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक प्रोजेक्टचे काम जोरदारपणे सुरू झाले आहे. तसेच अनेक नवीन प्रोजेक्टचीही घोषणा करण्यात येत आहे. आता अभिनेता अक्षय खन्ना हा अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्यावर आधारित एका चित्रपटात एनएसजी कमांडोची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.
यापुर्वीही अक्षय खन्नाने अनेक आव्हानात्मक भूमिका साकारलेल्या आहेत. “द ऍक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये साकारलेली त्याची भूमिकाही चाहत्यांना खूपच आवडली होती. हा एक फीचर चित्रपट असणार असून याचे दिग्दर्शन केन घोष करणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे.
या चित्रपटाचे शिर्षक “स्टेट ऑफ सीज ः अक्षरधाम’ असे असणार असून तो डिजिटल प्लॅटफॉर्म जी-5वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. गतवर्षी 26/11 मुंबई हल्ल्यावर आधारित “स्टेज ऑफ सीज 26/11′ वेबसीरिज प्रदर्शित करण्यात आली होती. या फ्रॅंचाइजीचा पुढील भाग हा अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्यादरम्यान एनएसजी कमांडोंनी राबविलेल्या ऑपरेशनवर आधारित आहे.
या चित्रपटात अक्षय खन्ना हा एका एनएसजी कमांडोची भूमिका साकारताना दिसणार आहे. जो हे ऑपरेशेन यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका साकारतो. तसे हा चित्रपट या हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पीत असणार आहे.