Rashi Khanna । करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीने आपल्या नवीन ऍक्शन फिल्म फ्रॅन्चायजीची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव “योद्धा’ आहे. आणि त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा लीड रोलमध्ये असणार आहे. तर अभिनेत्री राशी खन्ना या ऍक्शनपॅक्ड सिनेमात लीड रोल साकारणार आहेत.
सध्या राशी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान एका मुलाखतीत तिने आवडत्या करिअरबाबत खुलासा केला आहे. तिला ias अधिकारी व्हायचे होते असे तिने सांगितले आहे.
राशी म्हणाली, “मला नेहमीच आयएएस अधिकारी व्हायचे होते आणि मला वाटते की नियतीने मला सिनेमात आणले. ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप भाग्यवान समजते, कारण मी ती बाजू पाहिली.. वाटाघाटींसाठी जबाबदार असलेल्या सरकारी अधिकाऱ्याची भूमिका मी करत आहे. या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे.”
“योद्धा’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राशिवाय अभिनेत्री दिशा पटानी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले गाणे ‘जिंदगी तेरे नाम’ देखील रिलीज झाले होते. यामध्ये सिद्धार्थ आणि राशीची केमिस्ट्री पाहायला मिळाली. योद्धा १५ मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
राशी खन्नाच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचे झाल्यास, नुकतेच दक्षिणेतील सुपरस्टार नागा चैतन्यसोबत मॉस्कोमध्ये थँक यू या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
हे वाचले का ? मराठा समाजातील तरुणांनी विचारला प्रश्न,’नेत्यांना बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे ? बैठक न घेताच नेत्यानं सोडलं ‘गाव’