ईशान-जान्हवीचा करवाचौथचा व्हिडीओ पहिला का ?

मुंबई – गतवर्षी प्रदर्शित झालेल्या “धडक’ चित्रपटात ईशान खट्‌टर आणि जान्हवी कपूर एकत्रित झळकले होते. या जोडीला प्रेक्षकांनी खुपच पसंती दर्शविली होती. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा रंगली होती. अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांना एकत्रितपणे स्पॉट करण्यात आले होते. यातच जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या करवाचौथचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांमधील संबंधबाबतच्या चर्चा सोशल माध्यमांमध्ये रंगविल्या जात आहे.

 

View this post on Instagram

 

Tbt to being fit #seeusoon ????

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

दरम्यान, हा करवाचौथचा व्हिडिओ टीव्ही शो ‘मुव्ही मस्ती विथ मनीष पॉल’च्या सेटवरील आहे. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांनी नुकतीच मनिष पॉलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनी या ठिकाणी खूप मस्ती सुद्धा केली. त्यांनी यावेळी या सेटवर असा अभिनय केला की ते दोघंही रिअल लाइफमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहेत. या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला ‘दिल वाले दुल्हनियाँ ले जाएंगे’मधील करवाचौथ गीत सुद्धा ऐकू येत आहे.

 

View this post on Instagram

 

Pehli baar

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ईशान सध्या अनन्या पांडेसोबत “खाली पीली’ चित्रपटात व्यस्त आहे, तर जान्हवी आपल्या आगामी “कारगिल गर्ल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय जान्हवी “रूही अफजा’, “तख्त’ आणि “दोस्ताना’2′ चित्रपटात काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.