आमदार राजळेंच्या जाऊबाई प्रचारात

पाथर्डी  – आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाऊबाई व कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राहुल राजळे यांनी पाथर्डी शहरात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

गेल्या पाच वर्षात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सहकार्याने व आ. राजळे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात भरघोस विकास झाला असून पाथर्डी शहरातही नगरपालिका अंतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यापुढील काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन राजळे यांनी यावेळी मतदारांना केले.

यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, नगरसेवक प्रविण राजगुरू, रमेश गोरे, प्रसाद आव्हाड, रमेश हंडाळ, अनिल बोरुडे, बबन बुचकूल, नगरसेविका मंगलताई कोकटे, दीपालीताई बंग, भाजप शहराध्यक्ष महिला आघाडी ज्योतीताई मंत्री, महिला कार्यकर्त्या, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.