ज्या मालिकेने घडवला इतिहास..ती लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, पहा टीझर

मुंबई – मराठी रसिक प्रेक्षकांवर मोहिनी घालाणाऱ्या अनेक मालिका सध्या पुन्हा नव रूप धारण करताना दिसत आहेत. 10 वर्षांपूर्वी स्टाप प्रवाह वाहिनीवर अग्निहोत्र ही मालिका गाजली होती. प्रेक्षकांनी अक्षऱश या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना उचलून घेतल होत. आता तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होतेय.याचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या मालिकेच्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारे सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आले होते. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे ‘अग्निहोत्र’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. ‘अग्निहोत्र २’साठीही जोरदार तयारी सुरु झाली आहे. ‘अग्निहोत्र २’मध्ये कोणते कलाकार असतील याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

अग्निहोत्र 2 या मालिकेची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून पहिल्या पर्वात त्यांचीच कथा पहायला मिळाली होती. भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे ‘अग्निहोत्र २’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.