Entertainment – राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे. शिल्पा शेट्टी, सलमान खान, शाहरूख खान, रितेश देशमुख यासारख्या अनेक सेलीब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. मंगळवारी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani and Nita Ambani )यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी देखील गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. अंबानींच्या घरी राजकीय नेत्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अनेक कलाकारांचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळाला. मात्र यावेळी अभिनेत्री दिशा पटानीने (Disha Patani) परिधान केलेल्या कपड्यांवरून तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.
अंबानींच्या घरी आलेल्या अनेक सेलिब्रिटींचे पापीराझी यांनी फोटो आणि व्हिडिओ काढले. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यातील एका व्हिडिओत दिशा पटानी तिची अभिनेत्री मौनी रॉयसोबत अंबानींच्या घरी पोहोचली होती. दोघींनीही साडी परिधान केली होती. मौनीने गुलाबी रंगाची साडी आणि दिशा पटानीने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. या साडीवरील दिशा पटानीच्या ब्लाऊजने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले. साडीतही दिशाचा मॉडर्न अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
यावरून एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘साडीच्या सुंदर लूकला अश्लील कसं करायचं हे फक्त दिशालाच माहीत आहे’, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘गणपतीच्या दर्शनासाठी आलेली असताना तिने असे कपडे का परिधान केले आहेत?’ दरम्यान, दिशा पटानी नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र गणपती दर्शनासाठी आलेल्या दिशाने परिधान केलेल्या साडीवरून नेटकरी चांगलेच संतापलेले दिसत आहे.