नवी दिल्ली – भाजप सरकारने मागील 9 वर्षांत 9 सरकारे पाडली. पण सुप्रिया सुळेजी महाराष्ट्रात सर्वात आधी सरकार कुणी पाडले असेल तर ते शरद पवारांनी पाडले होते. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून भारतीय जनसंघाचे समर्थन घेऊन ते मुख्यमंत्री बनले होते, असे म्हणत केंद्रिय मंत्री अमित शहा यांची सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना आज प्रत्युत्तर दिले.
केंद्र सरकारवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेतील लोकसभेत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आजचा दिवस चांगलाच गाजला. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सायंकाळी अमित शहा यांनी उत्तर दिले. यामध्ये विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केलेल्या 9 वर्षांत 9 सरकार पाडण्याच्या आरोपाला आज त्यांच्या भाषणातून उत्तर दिले.
याच दरम्यान सभागृहात सत्ताधारी विरोधकांमध्ये चर्चा होऊन सुप्रिया सुळे यांनी माझे नाव घेतले म्हणून उत्तर देते असे म्हणत सुप्रिया सुळे या उत्तरासाठी उठल्या असता अमित शहा यांनी अध्यक्षांना उद्देशून हो-हो यांचे उत्तर ऐका, असे म्हणत ते खाली बसले.
यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या केली, एस. एम. जोशी त्या आघाडीचे समन्वयक होते. त्यावर अमित शहा म्हणाले की, एस.एम. जोशी समन्वयक होते खरे आहे. पण, मुख्यमंत्री कोण बनले?, सत्ता कुणी उपभोगली?, सत्तेचे सुख कोणी घेतले? असा टोला लगाविला.