मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली आपली युती संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे. परंतु, दुसरीकडे मात्र त्यांनी काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाच आंबेडकरांकडून आणखी एका मोठी घोषणा करत मविआला धक्का दिला आहे.
प्रकाश आंबेडकर हे बुधवारी 27 मार्चला अकोला लोकसभा मतदारसंघातून (Akola Lok Sabha Constituency) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, याबाबतची माहिती त्यांच्याकडूनच देण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी 27 मार्चला अकोला लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हा उमेदवार अर्ज भरण्यात येणार आहे. पण त्याआधी 26 मार्चला म्हणजेच बुधवारी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येईल. तर आम्ही मविआकडे केलेल्या आमच्या मागणीवर ठाम आहोत, पण मविआतील जागांचा तिढा सुटलेला नसल्याने त्यांच्या याद्या जाहीर होत नसल्याचे पाहायला मिळत आहेत, असे पुन्हा एकदा आंबेडकरांकडून सांगण्यात आले आहे.