मुंबई – इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स ‘आयफा’ 2023 ला अनेक बॉलीवूड कलाकरांनी हजेरी लावली होती. यावेळी अनेक कलाकरांनी विविध फॅशन केल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने केलेल्या हटके लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
जॅकलिन फर्नांडिसने आयफासाठी केलेला लूक विशेष चर्चेत आला. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला जोडून असलेली ओढणी तिने डोक्यावर घेतली होती. जॅकलिनच्या या साध्या लूकने सर्वांनाच वेड लावले. यावेळी तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्याचेही पाहायला मिळाले. या लूकचे चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. तर काहींनी तिला बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरवरून ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री जॅकलिनचा बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तिहार तुरुंगात आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचेही नाव पुढे आले होते.
दरम्यान, जॅकलिन फर्नांडिसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘सेल्फी’ चित्रपटात दिसली होती. मात्र, तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. आता ‘फतेह’ आणि ‘क्रॅक’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.