Fadanvis on Ashok Chavhan। काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला काल सोडचिट्ठी दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची उपस्थिती होती. यावेळी अशोक चव्हाण यांचे पक्षात स्वागत करताना फडणवीसांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित Fadanvis on Ashok Chavhan।
देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातलं एक ज्येष्ठ नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करतंय. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. विविध मंत्रीपद भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भाजपात प्रवेश करत आहेत. अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित असे फडणवीस म्हणाले.
पुढे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी,”अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काँग्रेसला पक्ष सांभाळता येत नाही Fadanvis on Ashok Chavhan।
काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे असे मुख्य नेत्याना वाटते म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही Fadanvis on Ashok Chavhan।
आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरं आहे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.