Prathamesh laghate : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम जोडी प्रथमेश लघाटे (Prathamesh laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha vaishampayan) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुग्धा-प्रथमेशने जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कुबली दिली. त्यानंतर आता या जोडीच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नुकतेचे मुग्धाच्या बहीणाचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पारपडला. त्यानंतर आता मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नुकतंच दोन्ही कुटुंबीयांचं व्याहीभोजन पार पडलं. त्याचे फोटो प्रथमेश आणि मुग्धाने सोशल मीडियावर पोस्ट केले.
काही दिवसांपूर्वी प्रथमेश आणि मुग्धाच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नुकतंच त्यांचं व्याहीभोजनही झालं. या व्याहीभोजनाचे काही फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी प्रथमेशने पारंपरिक कुर्ता-पायजमा आणि मुग्धाने काठपदराची साडी नेसली होती. दोघांचा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला. मात्र, या फोटोमध्ये प्रथमेशने दिलेल्या पोझमुळे त्याला एका नेटकऱ्याने ट्रोल केले. ‘मस्त फोटो आहे. फक्त प्रथमेशला सांग पुढच्यावेळी रोमॅण्टिक असल्यासारखा दिस… कारण तो सत्यनारायणाच्या पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको. बाकी खूप छान,’ अशी कमेंट एका युजरने केली होती.
View this post on Instagram
यावर प्रथमेशने देखील कमेंट करत उत्तर दिले की, “व्याही भोजन ही आपली परंपरा आहे. ट्रेडिशनल गोष्टीत कुठे रोमान्स घुसडवता राव? एवढं कन्फ्युजन,” असे ट्रोल करणाऱ्याला प्रथमेशने सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच्या या उत्तराला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीमुळेच मुग्धा आणि प्रथमेशची पहिल्यांदा भेट झाली आणि तिथूनच दोघांचे सूर जुळले. सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याने मागील काही दिवसांपासून या दोघांची चर्चा रंगली आहे.