बोनी कपूर आणि श्रीदेवीला दोन मुली आहेत. यातील जान्हवी कपूर या मोठ्या मुलीचे अगोदरच चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आहे. दुसरी मुलगी खुशी अद्याप प्रतीक्षेत आहे. म्हणजे तिला एन्ट्री करणे तेवढे अवघड नाही.
मात्र ती नक्की केव्हा येणार, प्रोजेक्ट कोणता असणार, निर्मिती कोण करणार, बोनी स्वत:ही बाहेरच्या बॅनरद्वारे तिचे पदार्पण होणार असे अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे केवळ आणि केवळ बोनीलाच ठावूक असणार. अन त्याचे अद्याप त्याची वाच्यता केलेली नाही.
दरम्यान, खुशी अद्याप नायिका झाली नसली तरी तिचे ग्लॅमर कोणत्याही नायिकेपेक्षा तसूभरही कमी नाही. बहीण जान्हवी कपूर किंवा चुलतबहीण सोनम कपूर यांच्याबाबत जेवढ्या बातम्या चालत असतात तेवढ्याच खुशीबद्दलही येतात.
तिचे फोटो, तिच्या जिमच्या बाहेर टिपलेल्या छबी, तिचे येणे-जाणे हे सगळे टिपले जाते आणि इंटरनेटवर ते जोरात चालते. लाखोंच्या घरात त्यावर लाइक्स आणि कॉमेंट्स येतात. याचाच अर्थ खुशी अगोदरच स्टार झाली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की तिचे आगमन होणार केव्हा?
बोनी कपूरने आपल्या भावांच्या अर्थात अनिल आणि संजय यांच्या पदार्पणाच्या वेळी निर्माता म्हणून प्रचंड खबरदारी घेतली होती. त्याकरता आपली सगळी ताकद पणाला लावली. अनिल कपूर तर सुपरस्टार पदापर्यंत पोहोचलेला. बच्चन यांच्यानंतर त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न त्याने केला. आजही अनिलची लोकप्रियता चांगली आहे. संजयचे बॉलीवूडमधील आगमन तसे धमाक्यात झाले नाही. मात्र, नंतर त्याने त्याची जागा निर्माण केली.
बोनीचा मुलगा अर्जुन कपूरनेही आपले स्थान निर्माण केले आहे. जान्हवीनेही बऱ्यापैकी ग्रीप घेतली आहे. खुशीच्या बाबतीत बोनी स्वत: काय करणार हे आता पाहावे लागेल. कारण लव्ह स्टोरीद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांना लॉंच करण्याचा त्याचा फंडा असतो. खुशीच्या बाबतीतही कदाचित तेच केले जाईल.