अभिनेता अक्षय कुमार आता रकुल प्रीत सिंह या अभिनेत्री सोबत काम करणार आहे. “बेलबॉटम’चे दिग्दर्शक रंजीत तिवारी यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार-रकुल प्रीत सिंह यांची जोडी झळकण्याची शक्यता आहे.
स्क्रिप्ट वाचताच अक्षय कुमारने त्याला तातडीने होकार दर्शविला. या चित्रपटातील अभिनेत्रीसाठी श्रद्धा कपूर, कियारा आडवाणी आणि रकुल प्रीत सिंह यांची नावे आघाडीवर होती. परंतु आता रकुलचे नाव निश्चित मानले जात आहे.
भलेही अक्षय आणि रकुल यांच्या वयात खूप अंतर आहे. परंतु यापूर्वी रकुलने अजय देवगणसह काम केलेले आहे, जो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे. परंतु ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.
“मे डे’, “थॅंक गॉड’, “डॉक्टर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती काम करत आहे. अक्षय कुमारसह तिच्या आगामी चित्रपटाची लवकरच अनाउंसमेंट होणार आहे.