अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जीवनावर आधारित “डोंगरी ते दुबई’ या सिनेमाचे शूटिंग पावसाळ्यानंतर होणार आहे. दाऊदच्या जीवनावर आधारलेल्या आणि हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या “डोंगरी ते दुबई’ याच नावाच्या पुस्तकावर आधारीत सिनेमाचे प्रॉडक्शन फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी करणार आहेत.
शूटिंगला सुरुवात झाल्यापासूनच या सिनेमाच्या कामात सतत अडथळे येत राहिले आहेत. अविनाश तिवारी, के के मेनन, जितिन गुलाटी, अमाचरा दस्तूर आणि कृतिका कामरा यांच्या प्रमुख भूमिका आणि शुजात सौदागरचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या कामाला करोनाच्या साथीपूर्वीच सुरुवात झाली होती.
सेट उभारला पण लॉकडाऊनमुळे तो पाडण्यात आला नंतर डायरेक्टरलाच करोनाचा संसर्ग झाल्यामुळे सगळ्या युनिटला विलगीकरणात जावे लागले होते. आता हे रखडलेले शूटिंग पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे, असे समजते आहे. ज्या सीनचे शूटिंग शिल्लक आहे, त्यामध्ये गर्दीची काही दृश्ये आहेत.