मुंबई – साऊथ स्टार समंथा प्रभू ही शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेली अभिनेत्री आहे. म्हणून अभिनयासोबतच तिच्या स्वभावामुळे देखील अनेक चाहते तिच्यावर फिदा होतात. परंतु फॅन्स कधीकधी नको ती गोष्ट करतात आणि मग स्टार्सना त्यांच्यावर राग व्यक्त करावा लागतो. समंथाने देखील आपल्या एका चाहत्यांच्या कानशिलात लगावली. हो हे खरं आहे प्रमोशन दरम्यान चिडलेल्या समंथाने चिडलेल्या फॅनच्या कानाखाली लगावली होती.
इंग्रजी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, काही वर्षांपूर्वी समंथा रुथ प्रभू एका मॉलमध्ये तिच्या एका प्रोजेक्टचे प्रमोशन करत होती, तेव्हा तिने या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याला सार्वजनिकरित्या कानाखाली मारली होती. ‘ये माया चेसावे’ आणि ‘वृंदावनम’ या चित्रपटांच्या उत्तुंग यशानंतर ही अभिनेत्री राज्याच्या विविध भागात चित्रपट प्रमोशनच्या कार्यक्रमांना हजेरी लावत होती. तिरुपती येथील एका मॉलमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्रीला पाहण्यासाठी मॉलमध्ये आलेल्या चाहत्यांच्या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करण्यात सामंथाचे बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी अपयशी ठरले.
यादरम्यान, एका चाहत्याने समंथाच्या अगदी जवळ जाण्यात यश मिळवले, ज्यामुळे सामंथा चिडली आणि तिने रागाच्या भरात त्याला कानशिलात मारली. इतकंच नाही तर, रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, अभिनेत्री इतर मुलांवरही ओरडली आणि चाहत्यांच्या वागण्याने रागावून मॉलमधून बाहेर पडली.
समंथाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 3 चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार्या गुणशेखरच्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटात ही अभिनेत्री पुढे दिसणार आहे. या वर्षी ८ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या हरिशंकरच्या यशोदा या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय ती 2023 मध्ये जगभरात प्रदर्शित होणाऱ्या विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’मध्येही झळकणार आहे.