मुंबई – समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथाला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टच्या अपडेटची चाहते आवर्जून वाट पाहत असतात. समंथाने आज तिचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा नो मेकअप फोटो चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.
समंथाने काही दिवसांपूर्वी पोस्ट केली होती की ती मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तिने आता केलेली ही पोस्ट पाहता, अभिनेत्री हळूहळू आजारातून बरी होत असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. समंथाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिचा नो मेकअप लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
समांथाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने डोळे मिटलेले असून चेहऱ्यावर हलके हसू दिसत आहे. फाईंड द लाईट असे कॅप्शन समांथाने या फोटोला दिले आहे. आता समंथा आनंदी आणि फिट असल्याचे पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. नूरानी चेहरा अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्याने आम्ही अशाच पोस्टची वाट पाहत होतो अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
साऊथ इंडस्ट्रीमध्ये समंथाचे मोठे फॅन फॉलोविंग आहे. समंथाने अनेक बड्या बड्या स्टार्ससोबत काम केलेलं असल्यामुळे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. १७ फेब्रुवारीला समांथाचा ‘शाकुंतलम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच समंथा लवकरच ‘सिटाडेल’ या लोकप्रिय सिरीजमध्ये देखील दिसणार आहे.