मुंबई – हॉलिवूड बॉलीवूड पेक्षाही साऊथ इंडस्ट्री चित्रपटांमध्ये खूप सारे एक्सपरिमेंट करताना दिसून येते. साऊथवाले चित्रपटात कधी तुफान हाणामारी करतात तर कधी अचाट डान्स करून दाखवतात. हाच वारसा पुढे चालवत अभिनेता ;विक्रम’ने एक आगळावेगळा प्रयोग करण्याचे धाडस साऊथ इंडस्ट्रीत दाखवले आहे. विक्रम आपल्या अआगमी चित्रपटात तब्बल २५ भूमिका साकारणार आहे.
अभिनेता दिग्दर्शक कमल हसनने देखील या आधी चित्रपटांमध्ये असा प्रयोग केला होता. कमल हसनने ‘दशावतार’ या चित्रपटामध्ये तब्बल १० भूमिका केल्या होत्या. विक्रम कमल हसनचे हे रेकॉर्ड तोडणार असून तब्बल २५ भूमिका साकारणार आहे. ‘कोब्रा’ नावाच्या चित्रपटात विक्रमने २५ भूमिका साकारण्याचे धाडस दाखवले आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
कोब्रा चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे भारतीय क्रिकेटर इरफान पठाण देखील या चित्रपटात भूमिका साकारतोय. ट्रेलरवरून तरी इरफान चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत असल्याचे समजते. हा चित्रपट तमिळ,तेलगूसह हिंदीमध्ये देखील रिलीज होणार आहे.