नवी दिल्ली – तुमच्या मुलाला रश्मीका मंदना सारख्या टॉपच्या अभिनेत्रीसोबत तसेच क्रिकेटर्ससोबत काम करण्याची संधी देतो असे सांगून भामट्याने चिमुकल्या कलाकाराच्या आई वडिलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. यासंबंधी सायबराबादच्या पोलिसांनी हैद्राबाद मधून एक बॉलिवूड अभिनेता आणि त्याच्या पत्नीला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे.
अपूर्व दावड़ा उर्फ अरमान अर्जुन कपूर उर्फ डॉक्टर अमित (४७) असं आरोपीच नाव असून नताशा कपूर उर्फ नाज़िश मेमन, उर्फ मेघना (२६) असं त्याच्या पत्नीचे नाव आहे. या दोघांनीही बालकलाकाराला काम देतो असे सांगून त्याच्या आई वडिलांकडून तब्बल पंधरा लाख घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या आरोपींनी बालकलारांचे शोज करतो त्यांना मोठे प्रोजेक्ट देऊ असे सांगून मॉडेलिंग एजन्सीद्वारे चिमुकल्या कलाकारांच्या पालकांकडून मेकअप आणि ड्रेसच्या नावाखाली पैसे देखील घेतले हते. तसेच केले मॉलमध्ये मुलांकडून रॅम्पवॉक देखील करवून घेतल्याची माहिती तक्रारदारांनी तक्रारीत दिली आहे. तसेच मॉडेलिंग शोच्या फायनल राउंडपूर्वी त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये तर फोटोशूटसाठी तब्बल 14 लाख 12 हजार रुपये मागण्यात आले होते. तसेच साऊथ स्टार रश्मीकासोबत एक बिस्किटाची जाहिरात मिळवून देतो असे आश्वासन देखील पालकांना यावेळी आरोपींकडून देण्यात आले होते.
पोलिसांनी यासंबंधी कारवाई करत पती पत्नीला अटक केली असून संबंधित रक्कम देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. आरोपींवर दाखल झालेली ही पहिलीच तक्रार नसल्याचे देखील समजते. यापूर्वी देखील आरोपींवर अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे तीन खटले दाखल असल्याचे समोर आले आहे.