एँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्‌सऍपकडून लवकरच नवीन सुविधा

मुंबई : एँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्‌सऍपमध्ये लवकरच डार्क मोड सुरू होणार आहे. सध्या व्हॉट्‌सऍपकडून यावर काम सुरू आहे. काही आयकॉन्सवर काम केले जात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सर्व एँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्‌सऍप डार्क मोड सुरू केले जाईल. पण डार्क मोड नक्की कधी रिलिज केले जाणार, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. WABetaInfo ने या संदर्भातील ट्‌विट केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्‌सऍपकडून डार्क मोडवर काम केले जाते आहे. व्हॉट्‌सऍपच्या गेल्या बिटा अपडेटमध्ये याबद्दल माहिती देताना डार्क मोड जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. व्हॉट्‌सऍपकडून आयओएस अर्थात आयफोनमधील आपल्या ऍपसाठीही डार्क मोड देण्यावर काम केले जात आहे. पण एँड्राईड मोबाईलमधील ऍपच्या तुलनेत आयफोनमधील व्हॉट्‌सऍपच्या डार्क मोडवर जास्त काम करावे लागणार आहे. या मोबाईलमधील लेबल्स आणि पार्श्वभूमी या दोन्हीवर काम केले जाणार आहे. ते पूर्ण झाल्यावरच व्हॉट्‌सऍपकडून आयफोनसाठीही डार्क मोड सुरू केले जाईल.

व्हॉट्‌सऍपकडून आधी बिटा वापरकर्त्यांसाठी नव्या सुविधा दिल्या जातात. त्यांचा प्रतिसाद बघून मगच कंपनीकडून सर्व वापरकर्त्यांसाठी नव्या सुविधा दिल्या जात असतात. व्हॉट्‌सऍपकडून सार्वजनिक बिटा वापरकर्त्यांसाठी अद्याप डार्क मोडची सुविधा देण्यात आलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.