Instagram Features : इंस्टाग्रामने (Instagram) आज सर्वांनाच वेड लावले आहे. त्यात रोज काही तरी नवीन करण्याचा विचार आजकालची तरुणाई करत असते. आता त्यांच्यासाठीच इंस्टाग्रामने मैत्रीत गोडवा टिकावा म्हणून नवे फिचर लॉन्च करणार आहे. आता लवकरच इन्स्टाग्राम 3 नवे फीचर्स आणणार आहे. ज्यामुळे, वापरकर्त्यांचा इन्स्टाग्रामवरील (Instagram) अनुभव आणखी चांगला होईल.
या फिचर्समध्ये सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्स, बर्थडे फिचर आणि इन्स्टा स्टोरीजसाठी मल्टीपल लिस्ट सारख्या फिचर्सचा समावेश असणार आहे. याबद्दल मेटाने महत्वाची माहिती दिली आहे.
सेल्फी व्हिडिओची इन्स्टाग्रामवर (Instagram) चांगलीच चलती आहे. या सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्स जोडण्यासाठी इन्स्टाग्राम लवकरच सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्सचे नवे फिचर आणणार आहे. या फिचरच्या माध्यमातून युझर्स बोलून आणि व्हिडिओ बनवून त्यांचे म्हणणे प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकणार आहेत.
अनेकदा आपण एकमेकांचे वाढदिवस विसरतो. कित्येकदा नोटिफिकेशन येऊन ही आपले त्याकडे लक्ष जात नाही. परंतु, आता असे होणार नाही. कारण, Meta चे इन्स्टाग्राम (Instagram) लवकरच आपल्या युझर्ससाठी खास बर्थडे फिचर आणणार आहे. या फिचरच्या मदतीमुळे युझर्स त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रोफाईलवर ‘बर्थडे इफेक्ट’ अॅड करू शकतीलं. यामुळे इन्स्टाग्रामवरील (Instagram) इतर युझर्सना कळेल की आज तुमचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे हे फिचर युझर्सला त्यांच्या फॉलोअर्सच्या वाढदिवसाबद्दल अपडेट्स देण्याचे काम करेलं. तसेच, त्यांना लोकांसोबत स्टिकर्स अपडेट करण्याचीही परवानगी देण्यात येईल.
इन्स्टास्टोरीचा वापर वापरकर्त्यांकडून नेहमीच केला जातो. आता यामध्ये मल्टिपल स्टोरीज लिस्टचे फिचर इन्स्टाग्राम आणणार आहे. मल्टिपल स्टोरीज लिस्ट नावाच्या या फिचरमध्ये तुम्हाला ज्यांना तुमची स्टोरी दाखवायची आहे त्यांना तुम्ही स्टोरीमध्ये समाविष्ट करू शकता. इन्स्टाग्रामने(Instagram) म्हटलेयं की ते लवकरच या फिचरला अपग्रेड करतील. त्यानंतर, युझर्स त्यांची स्टोरी दाखवण्यासाठी विविध प्रकारची लिस्ट बनवू शकतीलं.