नवीन गॅझेट खरेदी केल्यानंतर अनेकजण आपली जुनी गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण तशीच घरात ठेवतात. हे गॅझेट्स उपयुक्त नसतात, परंतु घरातील जागा निश्चितपणे व्यापतात. आता बर्याच ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोबाईल सारख्या गॅझेट्सची देवाणघेवाण करण्याची सुविधा आहे, परंतु उर्वरित गॅझेट्स घरी धुळीत ठेवण्याऐवजी विकणे चांगले आहे.
तुम्हालाही घरात पडलेले जुने गॅजेट्स विकून मोठी कमाई करायची असेल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही ऑनलाइन वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या स्मार्टफोन ते टॅबलेट आणि टीव्ही ते एसीपर्यंत विकू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. चला जाणून घेऊया.
* कॅशिफाय (Cashify)
कॅशिफाय वेबसाईटवर स्मार्टफोन, टॅब्लेट, टीव्ही, कॅमेरा, आयमॅक्स, गेमिंग कन्सोल आणि एसीसारख्या गॅझेट्सची विस्तृत श्रेणी विकली जाऊ शकते. या वेबसाईटवर तुम्हाला गॅजेट्सची चांगली किंमतही मिळेल. स्मार्टफोनच्या बाबतीत, ही साइट इतर साइटच्या तुलनेत खूपच चांगली किंमत देते. या ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे उत्पादन कमी वेळेत सहज विकू शकता.
* 2 गुड (2gud)
Cashify प्रमाणेच, 2gud ही वेबसाईटही स्मार्टफोन, टॅब्लेट, गेमिंग कन्सोल आणि टीव्ही यांसारख्या गॅझेट्सचीही विक्री करते. फ्लिपकार्टच्या मालकीच्या या साइटवर गॅझेट खरेदी आणि विक्री करता येते. या साइटवर रिटर्नचा पर्यायही उपलब्ध आहे.
* कर्मा रिसायकलिंग (karmarecycling)
येथे ग्राहक त्यांचे जुने आणि सदोष गॅजेट्स जसे की स्मार्टफोन, टॅबलेट सहज विकू शकतात. कंपनी 2013 पासून कार्यरत आहे आणि आता भारतातील लोकप्रिय पुनर्वापर केंद्रांपैकी एक आहे. www.karmarecycling.in ने आत्तापर्यंत 4 लाखांहून अधिक गॅजेट्स खरेदी केले आहेत.
* गेटइंस्टाकॅश (Getinstacash)
Getinstacash वेबसाईटवर, तुम्ही तुमच्या घरातील कोणतेही जुने गॅझेट आरामात विकू शकता आणि चांगली किंमत मिळवू शकता. तुमच्या बुकिंगनंतर कंपनीचे कर्मचारी तुमच्या घरी येतील आणि फोन घेऊन किंमत देतील. तथापि, इंस्टकॅशवर फक्त स्मार्टफोन विकले जाऊ शकतात.