ऐश्‍वर्या रायकडे पुन्हा “गुड न्यूज’

सोशल मिडीयावर ऐश्‍वर्या रायचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिच्याकडे पुन्हा एखादी “गुड न्यूज’असल्याचा अंदाज वर्तवला जायला लागला आहे. या फोटोमध्ये ऐश्‍वर्याने आपली ओढणी आपल्या अंगावर अशा प्रकारे ओढून घेतली आहे, की आपली “गुड न्यूज’ लोकांना इतक्‍यात समजायलाच नको, असा प्रयत्न ती करते आहे की काय, असा भास होतो.

खरे तर हा फोटो मुकेश अंबानीची बहिण नीना कोठारीची मुलगी नयनताराच्या प्री-वेडिंग पार्टीच्यावेळचा आहे. ऐश्‍वर्याने साडी ऐवजी जो ड्रेस परिधान केला होता, त्याची ओढणी पुढच्या बाजूस जरा जास्तच विस्तारलेली होती. या ड्रेसचे डिजाईन सव्यसाचीने केले होते. खरे तर या ड्रेसमध्ये ऐश्‍वर्या खूपच सुंदर दिसत होती.

मात्र गॉसिप गॅंगला त्यामधून तिच्याकडील “गुड न्यूज’चा भास झाला असावा. आपले वाढलेले पोट लपवण्याचा प्रयत्न ऐश्‍वर्या करत असावी, असा पब्लिकचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्‍वर्या आणि अभिषेक एका बीचवर हिंडत असल्याचाही फोटो व्हायरल झाला होता. तेंव्हाही हीच शंका इंटरनेटवर व्यक्‍त केली जाऊ लागली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.