न्यूयॉर्क: अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील त्यांचा पराभव स्वीकार करण्याचे संकेत दिले आहेत. ज्या जॉर्जियात अजूनपर्यंत मतमोजणी सुरु होती. तिथेही जो बायडय यांचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत निवडणुकीतील त्यांचा पराभव मान्य करण्यास नकार दिला होता तसेच त्यांनी या निवडणुकीतील निकालास न्यायालयात आव्हान देण्याची भाषा केली होती.
कोरोना व्हायरस संबंधित ब्रिफिंग दरम्यान ते म्हणाले की,”कोणालाच माहीत नाही की, पुढचे प्रशासन कोणाचे असेल. भविष्यात जे काही होईल ते येणारा काळच ठरवेल.”
अमेरिकेत 20 जानेवारी ही नियोजित सत्तांतराची तारीख ठरलेली आहे. निवडणुकीतील निकालानंतर या विषयावर बोलण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ आहे. त्यावरुन असा अंदाज लावण्यात येत आहे की, ट्रम्प आता त्यांचा पराभव मान्य करतील. त्यांच्यासोबत काम केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनेही अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.
अमेरिकेचा कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात पहिला क्रमांक लागत आहे. सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे त्या देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तववली जात आहे. अशाही परिस्थितीत ट्रम्प यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.