संयम सुटला तर काय कराल ?

आदित्य ठाकरेंना भाजप पक्षाचा उलट सवाल

मुंबई –  हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या विषयाचा दि एन्ड होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

मुंबईतील आपल्या राहत्या घरात सुशांतने फाशी घेऊन आत्महत्या केली त्याला दोन महिने होऊन गेले, अद्यापही या प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला आता राजकारणानेही वेढा घातला आहे.

दरम्यान, या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे घेत आहे. याच मुद्यावरून आदित्य ठाकरेंनी दिलेल्या स्पष्टीकरणावर भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहे.

‘मी आजही संयम ठेवलेला आहे’… या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा? ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल. असं म्हणत अतुल भातखळकर यांनी त्यांना उलट सवाल केला आहे.

तत्पूर्वी, ‘हे तर गलिच्छ राजकारण; पण मी सयंम बाळगलाय असं म्हणत महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.