काही काळानंतर कुलकर्णी घरात बरेच बदल दिसून येतात. आसावरी मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे. पूर्ण आत्मविश्वासाने तिने आता office successfully हातात घेतले आहे. तीच्या सोबत तिचा सोहम आता Right hand म्हणून काम बघतोय.
तसेच अभिजित राजेंनी त्यांच्या style ने स्व खुषीने घर सांभाळायला घेतले आहे. शुभ्रा ने आई पण स्वीकारून तिच्या मुलाची म्हणजे बबडूची जबाबदारी सांभाळत नव्या संसाराला सुरुवात केली आहे. अश्या ह्या कुलकर्णी कुटुंबात शुभ्राला संसाराच्या काही Tips देत आसावरी पुन्हा शुभ्राला Independent करण्यच्या मार्गावर हे कथानक आधारले आहे.
ह्या निमित्ताने उमा पेंढारकर च्या रूपाने एक फ्रेश चेहेरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अग्गबाई सुनबाई’ पाहायला विसरू नका १५ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.