आज जे काश्मीरमध्ये झाले ते उद्या विदर्भ आणि मुंबईमध्ये होणार- राज ठाकरे

मुंबई: ‘काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचं म्हणून इंटरनेट बंद केलं गेलं, टीव्ही बंद केले गेले, कर्फ्यू लावला गेला. उद्या असंच महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ ह्यांच्याबाबतीत घडू शकतो, आणि हे का घडतंय तर बहुमताच्या जोरावर’, असे राज ठाकरे म्हणाले ते मुंबईत येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.

काल नरेंद्र मोदी म्हणाले की ३७० कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, पण अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे, मग तिथे गेल्या ५ वर्षात रोजगार का निर्माण करू नाही शकलात? गेल्या ४५ वर्षातला बेरोजगारीचा आकडा सगळ्यात जास्त असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्र भाजप मधील एक वरिष्ठ नेत्याने बाळा नांदगावकरांना सांगितलं की भाजप सोडून महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार कारण ईव्हीएम मशीन आमच्या ताब्यत आहेत. २३ मे च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मी फक्त ‘अनाकलनीय’ अशी प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर मी बोललोच नाही.

मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे ह्या दोन्ही नेत्यांना सांगितलं. त्यांनी देखील हा धोका मान्य केला. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या सोबत आहोत.

३७१ मतदारसंघांमध्ये भाजपने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार केले गेले पण ह्यावर कोणी बोलायला तयार नाही. राजकीय पक्ष प्रचार करणार, सभा घेणार, पैसे खर्च करणार आणि तरीही जर भाजप ईव्हीएमच्या जोरावर मतदान हवं तसं फिरवणार असेल तर राजकीय पक्ष कशा निवडणूक लढवणार ? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ३५० जागा येतील अशा घोषणा भाजपचे नेते करत होते, तसंच झालं. आत्ता पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २२०,२३० असे आकडे घोषित करत आहेत, आणि हा आकडा खरा वाटावा म्हणून भावनिक विषय पुढे करायचा आणि मग ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या हि भाजपची खेळी असल्याचे ठाकरे म्हणाले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)