Amit Shah – भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. गोधरा कांडात जीव वाचविण्यासाठी राम जेठमलानीचे पाय चाटत असल्याचा आरोप त्यांनी अमित शहा यांच्यावर केला आहे.
तुरुंगात जाऊन आलो म्हणून माझी विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करता मग अमित शहा देखील तुरुंगात जाऊन आले त्यांचे काय?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
गोटे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या भाषेत आरोप होणार त्याच भाषेत मी उत्तर देणार. इशरत जहॉं प्रकरणात अमित शहा फरार होते. मी तसे काहीही केले नाही. मी कारवाईला सामोरे गेलो. माझी केस मी स्वतः लढवली. मी जे केले ते स्पष्ट सांगतो आणि मान्य देखील करतो.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखी मी लपवालपवी करत नाही. भाजपचे देशप्रेम हे अतिशय ढोंगी आहे. भाजपाचे नेते लबाड आहेत. देवेंद्र फडणवीस तो झुटो के सरदार है! अशा शब्दात गोटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
गोटे यांनी भाजपवर निशाणा साधताना पुढे म्हटले की, ओबीसी अन् मराठा समाजात भांडणे लावण्याचा भाजपचा डाव आहे. राज्यातील शेतकरी, महागाई, बेरोजगार व गोरगरीबांच्या हलाखीच्या परिस्थितीवर भाजपकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही.
दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याच्या आश्वासनातील भोंगळपणा जनतेच्या लक्षात आला आहे. हिंदू-मुस्लिम दंगली होत नाहीत म्हणून जातीय द्वेषाचा नवा फॉर्म्युला तयार केला जात आहे.