#ENGvWI Test Series : शेवटच्या कसोटीत प्राण पणाला लावणार

मॅंचेस्टर – वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने म्हटले की, ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आमची टीम विकेट गमावत गेली. त्यामुळे आमच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

शारमाह ब्रूक्‍स (62) आणि ब्लॅकवुड (55) यांच्या शानदार अर्धशतकी खेळामुळे आणि होल्डरच्या 35 धावांच्या झुंजार खेळीनंतर सुद्धा वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयापासून रोखू शकले नाही.

इंग्लंडने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या करोटी मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सामन्यानंतर पुरस्कार वितरणावेळी होल्डरने म्हटले की, आम्ही या निकालामुळे निराश झालो आहोत. इंग्लंड शानदार खेळल्यामुळे त्यांना विजयाचे श्रेय जाते.

होल्डर पुढे म्हणाला की, आम्ही चौथ्या दिवशी सामन्यावर पकड निर्माण करू शकत होतो. मात्र एकापाठोपाठ विकेट गमावल्याने आम्ही निराश झालो. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आमच्या फलंदाजांना चांगलेच झुंजविले. त्यांच्या गोलंदाजांनी सरस कामगिरी केल्याने विजय त्यांच्या पारड्यात पडला. होल्डरने पुढे म्हटले की, आम्ही येथे लढण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे शेवटच्या सामन्यात आम्ही प्राण पणाला लावून खेळणार आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.