पुणे – कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात आज 15 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी वाजत-गाजत प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिका ढोले पाटील रोड विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, डॉन बॉस्को सुरक्षा संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर तेहसीन शेख आणि पर्यवेक्षक मंगल भोईर उपस्थित होत्या.
या वेळी सर्व 1 ली ये 8 वी तील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजने अंतर्गत पाठ्यपुस्तके, खाऊ आणि गुलाब पुष्प देण्यात आल्याने विद्यार्थी खुश होते. इयत्ता 1 ली मध्ये दाखल विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांर 2 चे आयोजन ही करण्यात आले होते. या वेळी इयत्ता 1 ली मध्ये दाखल विद्यार्थ्यांची विविध खेळातून शारिरीक बौद्धिक, तोंडी प्रश्न विचारून तयारी पहाणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन कस्तुरबा गांधी विद्यालयचे प्रभारी मुख्याध्यापक चांगदेव बिचकुले व सर्व शिक्षक आणि सेवक यांनी केले होते . या प्रसंगी 25 मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला.