पंकजा मुंडेंचे भव्य पुष्पहार घालून स्वागत

पाथर्डी:  भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे मित्र मंडळाच्या वतीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे भव्यदिव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. क्रेनच्या साह्याने आणलेल्या या भव्यदिव्य पुष्पहाराची चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे.

अहमनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ ना. मुंडे शनिवारी सायंकाळी पाथर्डी शहरात आल्या होत्या. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे मित्र मंडळाच्या वतीने शहरातील वसंतराव नाईक चौकात वेगवेगळे फुले वापरून बनवलेला भव्यदिव्य हार घालून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे हा हार क्रेनच्या साह्याने रस्त्यावर आणण्यात आला होता.

पाथर्डी शहरात प्रथमच असा भव्यदिव्य हार घालून स्वागत झाल्याने ना. मुंडे सुद्धा आश्‍चर्यचकित झाल्या. या भव्यदिव्य स्वागत समारंभानंतर नामदार मुंडे यांची सजवलेल्या खुल्या जीपमधून सभा स्थळापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अमोल गर्जे मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पाथर्डी शहरात भावाकडून झालेला सन्मान कधीही विसरण्यासारखा नसल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी यावेळी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.