बॉलीवूडमधील ऍक्शन हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा युवा अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा सिजलिंग केमिस्ट्री “बागी’ चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पहिल्या दोन चित्रपटांपेक्षाही बिग बजेट असणार आहे. या बिग बजेट असलेल्या चित्रपटाचे 4 देशांमध्ये शूटिंग करण्यात येणार आहे.
“बागी-3’चे प्रड्यूसर साजिद नाडियाडवाला आणि डायरेक्टर अहमद खान हे चित्रपटाच्या क्रू टीमसोबत चार देशांतील लोकेशन्स पाहण्यासाठी जाणार असल्याची समजते. ही टीम मोरक्को, इजिप्त, सर्बिया आणि टर्की आदी ठिकाणी 15 दिवसांसाठी मुक्कामी जाणार आहेत. या 15 दिवसांमध्ये ते या चार देशांमधील लोकेशन निश्चित करणार आहेत. त्यांच्या मते, टर्की आणि सर्बिया येथील शूटिंग निश्चित करता येईल. पण पर्याय म्हणून इजिप्त आणि मोरक्को येथील लोकेशन पाहण्यात येणार आहे.
दरम्यान, “बागी 3′ चित्रपट पुढील वर्षी 6 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर, तर दुस-या पार्टमध्ये दिशा पाटणी झळकली होती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता प्रेक्षकांना तिस-या पार्टची उत्सुकता लागली आहे.