सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ ते २३ एप्रिल या कालावधीत प्रथम दिनी ज्ञानेश्वर महाराज जोशी व रामेश्वर महाराज राऊत (शास्री) यांचेहस्ते ध्वजारोहण व पंढरीनाथ महाराज तांदळे यांचेहस्ते दिप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात होईल.
हरिनाम सप्ताहामध्ये १६ एप्रिल रोजी सुदर्शन महाराज शास्री त्रिभुवनेश्वर देवस्थान त्रिभुवनवाडी, दि १७ एप्रिल रोजी इंद्रजित महाराज रसाळ, दि. १८ संत चरणरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर, दि १९ स्वामी अरुणाथगिरीजी महाराज, दि.२० गणेश महाराज वारंगे,
दि २१ महंत आदिनाथ महाराज शास्री, दि. २२ रविदास महाराज शिरसाठ,२३ एप्रिल रोजी सकाळी ६ श्रींचा अभिषेक , ७ ते ९ गंगा कावड, ग्रंथ मिरवणूक, सकाळी १० ते १२ हभप रामेश्वर महाराज शास्री यांचे काल्याचे कीर्तन होऊन अमोल तांदळे यांचेवतीने महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी ७ ते ९ छबिना मिरवणूक होईल.