फलटण, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपला उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 16 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे भरणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातून गत वेळेस भाजपाच्या तिकिटावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून आले होते यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा भाजपाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली असून महाराष्ट्रातील भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव होते.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवारी अर्ज दि. 16 रोजी हे मोठे शक्ती प्रदर्शन करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.