“जल’ आणि “गुलाब गॅंग’ सारख्या सिनेमांमधून काम केलेली अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी हिने दिग्दर्शित केलेला “ोरोम रोम’ हा लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
तनिष्ठा चॅटर्जीने देशातील सिनेमे केले आहेत. त्याबरोबर तिने आंतरराष्ट्रीय सिनेमेही बरेच केले आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे ती भारतीय सिनेमांची पाश्चात्य सिनेमांबरोबर तुलना करते.
“स्लमडॉग मिनेनियर’ सारखा विदेशी सिनेमा भारताच्या भूनीवर तयार केला जाऊ शकतो. त्यामध्ये भारताती त्रुटी दाखवल्याही जाऊ शकतात.
जर पाश्चात्य निर्माते त्यांच्या दृष्टीकोनातून भारताकडे बघू शकतात, तर मग भारतीय निर्माते पाश्चात्य सिनेमांकडे स्वतःच्या दृष्टीकोनातून का नाही बघू शकत. सिनेमा हे एक क्रॉस बॉर्डर माध्यम आहे.
असा तिचा विचार आहे. याच विचारातून तिने “रोम रोम में’हा सिनेमा बनवला आहे. त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ईशा तलवार हे लीड रोलमध्ये आहेत. 16 व्या शतकातील एका इटालियन चित्रकार महिलेवर या सिनेमाची कथा आधारलेली आहे.
ही महिला एक फेमिनिस्ट होती आणि तिच्या स्त्री स्वतंत्र्यावावतच्या क्रांतिकारी विचारांमुळेच पश्चिमेकडील आजच्या स्त्रिया स्वतंत्र्य उपभोगू शकत आहेत, असे तनिष्ठा चॅटर्जीला या सिनेमातून दाखवायचे आहे.