#WC2019 : धोनी-पांड्याच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे भारताचे विंडीजला २६९ धावांचे आव्हान

मँचेस्टर – विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यामध्ये आज भारत विरुद्ध वेस्टइंडीज असा सामना रंगला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कॅरेबियन गोलंदाजांनी केलेल्या सटीक गोलंदाजीमुळे कोहलीने घेतलेला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फारसा सफल ठरल्याचे दिसले नाही.

बड्या फलंदाजांचा भरणा असलेल्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजसामोर गड्यांच्या मोबदल्यात केवळ २ धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा केवळ १८ धावांवर तंबूत परतल्याने कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. कोहली आणि के एल राहुल चांगली खेळी करीत असताना होल्डरने राहुलला वैयक्तिक ४८ धावांवर असताना त्रिफळाचित करत तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर मैदानात आलेल्या विजयशंकर आणि केदार जाधव यांनी निराशा केली. विजय शंकर १४ तर केदार जाधव केवळ ७ धावा करून तंबूत परतले.

१४० धावांवर ४ गडी गमावल्याने दबावात आलेल्या भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारताचा अनुभवी फलंदाज महेंद्र सिंह धोनी क्रीजवर दाखल झाला. त्याने कर्णधार विराट कोहली याच्यासोबत संयमी खेळी करत ४० धावांची भागीदारी केली मात्र ३८.२ षटकात संघाची धावसंख्या १८० असताना होल्डरने विराटचा बळी घेत भारताला पुन्हा एकदा अडचणीत आणले.

प्रमुख फलंदाज बाद झाल्याने धावांची गती कमी झालेली असताना कोहलीनंतर मैदानात उतरलेल्या हार्दिक पांड्याने  सुरुवातीला आपल्या आक्रमक फलंदाजीला आवर घालत धोनीसह संयमी फलंदाजी केली. पांड्या आणि धोनीने १० षटकांच्या भागीदारीमध्ये ७० धावांची भर टाकत संघाची धावसंख्या २५० धावांपर्यंत पोहोचवली. ४८.२ षटकांमध्ये संघाची धावसंख्या २५० असताना पांड्या बाद झाला. त्यानंतर धोनीने अखेरच्या षटकामध्ये २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत १६ धावांची भर घातली. धोनीच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाला २६८ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

Leave A Reply

Your email address will not be published.