न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील सकारात्मक निर्णयाचं खासदार संभाजी राजेंकडून स्वागत

कोल्हापूर – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या सकारात्मक निर्णयाचं कोल्हापूरचे राजे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी स्वागत केल आहे. तसेच आजच्या या लढ्याला यश जर कुणाला द्यायचा असेल तर ते मराठा समाजातील सर्व घटकांना दिले गेले पाहिजे तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे.

सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात बाजू भक्कमपणे मांडली त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आरक्षण किती टक्के मिळालं याला महत्त्व नाही परंतु आरक्षण न्यायालय टिकलं हे फार महत्त्वाच असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.