पिंपरी – शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी (दि. 6) दुपारी 12 नंतर काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी विस्कळीत होणार आहे. तरी, नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.
रावेत येथील जलउपसा केंद्रातील पंपगृहांमधील विद्युतविषयक तातडीच्या दुरूस्ती कामासाठी मंगळवारी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत जलउपसा बंद राहणार आहे.
पर्यायाने, मंगळवारी दुपारी 12 नंतरचा, सायंकाळचा व रात्रीचा तसेच बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.