अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. आता तिने प्रभासबरोबरच्या आपल्या लग्नाबद्दलचे मौन तोडले आहे. तिने#AskAnushka सेशनच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनी आगामी “निशब्दम’ चित्रपटासह अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. यात अनुष्काने आर. माधवनसोबत स्क्रीन शेअर केली आहे. एका चाहत्याने अनुष्का आणि प्रभास यांच्या लग्नाचा एक व्हायरल फोटो शेअर केला.
हा फोटो अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो आणि अनुष्का-प्रभास यांच्या लग्नाच्या अफवा सुरू होतात. याफोटोबाबत अनुष्का म्हणाली, हा फोटो “मिर्ची’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीचा आहे.
हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. दरम्यान, प्रभास हा अखेरच्या वेळी “साहो’ चित्रपटात झळकला होता, तर अनुष्का शेट्टीचे “निशब्दम’ (तेलुगु) आणि “साइलेंस’ (तमिळ) हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले होते. दुसरीकडे प्रभासने पूजा हेगडेसोबतच्या आपल्या आगामी “राधेश्याम’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात सैफ अली खानही मुख्य भूमिका साकारत आहे.