लंडन – आधुनिक काळात मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर हिंसेला प्राधान्य दिले जाते हिंसात्मक मनोरंजन असलेल्या कार्यक्रमांना प्रेक्षक वर्गही चांगला लाभतो पण आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे लहान मुलांनी जर टीव्हीवर हिंसा असलेले मनोरंजक कार्यक्रम पाहिले,
तर आगामी दहा वर्षे त्यांच्या मनावर परिणाम राहतो आणि नंतरच्या काळात त्यांना डिप्रेशन किंवा चिंताग्रस्तपणा यासारख्या आजारांशी सामना करावा लागतो युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रियलने याबाबतचे संशोधन केले असून त्यामध्ये म्हटलेल्या निष्कर्षाप्रमाणे लहानपणी बघितलेल्या हिंसात्मक मनोरंजनामुळे या लहान मुलांची किशोरावस्था सुद्धा बिघडू शकते हिंसात्मक कार्यक्रमांचा परिणाम लहान मुलांच्या मनावर दहा वर्षे राहतो त्यामुळे त्यांची शिक्षण घेण्याची क्षमताही कमी होते जर्नल ऑफ डेव्हलपमेंट अँड पीडियाट्रिक बिहेवियर या आघाडीच्या नियतकालिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
या संशोधनाच्या प्रमुख डॉक्टर लिंडा पगानी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लहान मुले टीव्हीवर जे कार्यक्रम पहात असतात त्या कार्यक्रमातील पात्रांना ते खरे मानत असतात त्यामुळेच या कार्यक्रमांचा त्यांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम राहतो लहानपणीच हिंसात्मक कार्यक्रम पाहिल्यामुळे लहान मुलांना अशा प्रकारची हिंसा ही काही वेगळी किंवा चुकीची गोष्ट आहे असे वाटत नाही त्याचाही दीर्घकाळ परिणाम त्यांच्या मनावर राहतो आणि किशोर अवस्थेमध्ये हा परिणाम जास्त प्रमाणात दिसून येतो डॉ पगानी यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांना कोणते कार्यक्रम पाहावेत याबाबत उपदेश करणे गरजेचेच आहे पण जरी ते हिंसात्मक कार्यक्रम पहात असतील तरी ते खरे नाही आणि त्या गोष्टी खऱ्या नसतात.
हे या मुलांना समजून सांगणे सर्वात महत्त्वाचे आहे या संशोधनात चार ते पाच वयोगटातील 2000 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले या विद्यार्थ्यांना लहानपणी हिंसक कार्यक्रम बघण्याची सवय होती हे विद्यार्थी जेव्हा बारा वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा त्यांनी लहानपणी बघितलेल्या कार्यक्रमांचा परिणाम अजूनही त्यांच्या मनावर असल्याचे लक्षात आले या निष्कर्षनंतर संशोधकांनी पालकांना काही सूचना दिल्या आहेत घरातील आई-वडील जे बघत असतात तेच कार्यक्रम बघण्याचा मुलांचा कल असतो त्यामुळे आपण काय बघणार आहोत याची निवड पालकांनी जाणीवपूर्वक करावी असे संशोधकांनी म्हटले आहे मुले लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये काय पाहत आहात याच्याकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे हिंसाचार हा कधीही योग्य नसतो हे पालकांनी मुलांना सतत समजवणे आवश्यक असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.