पिरंगुट- चाले आणि मुगावडे येथे नदीकाठी सुरू असलेल्या दारूभट्टया पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते यांच्या पथकाने उद्ध्वस्त केल्या आहेत. याठिकाणी दारू तयार करण्यासाठी लागणारे सगळे साहित्य नष्ट केले. दारू साठवून ठेवण्यासाठी असणारे ड्रम आणि टाक्या फोडून टाकण्यात आले.
सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र बंद असताना चाले आणि मुगावडे येथे नदीकाठावर दारू भट्ट्या जोरात सुरू आहेत तसेच येथे काढलेला दारूचा माल दुसऱ्या ठिकाणी विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती दुधभाते यांना मिळाली. यानंतर त्यांच्या पथकाने चाले व मुगावडे याठिकाणी जाऊन ही कारवाई केली. यात पोलीस कॉंन्स्टेबल रॉंकी देवकाते, श्रीधर जगदाळे, कोतवाल चंद्रकांत हुलावळे, तेजस मारकड यांनी केली.