लॉकडाऊनमध्ये केवळ आवश्यक वस्तू वितरीत करण्यास सूट- गृहमंत्रालय

नवी दिल्ली : लॉकडाऊन कालावधीत सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे अनावश्यक वस्तूंच्या विक्रीस बंदी घातली आहे. चार दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांना मोबाईल फोन, रेफ्रिजरेटर आदी वस्तू विक्री करण्याची परवानगी होती. मात्र, आता ही सूट मागे घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. तत्पूर्वी, सरकारच्या आदेशानुसार 20 एप्रिलपासून ई-कॉमर्स कंपन्या जीवनावश्यक उत्पादने विकू शकणार आहेत.

या बाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी रविवारी आदेश जारी केला. एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमुळे ई-कॉमर्स कंपन्यांनी अनावश्यक उत्पादनांची विक्री बंद केली आहे. या आदेशात म्हटले आहे की, ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित आवश्यक वाहनांना प्रवास करण्याची परवानगी होती, त्यात आता बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार ७१२ वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत 507 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, 2हजार 231 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.