पुणे – दिवाळीला मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी शिवाजीनगर आगारामार्फत जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बस पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी येथून सोडण्यात येणार असून, प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे, अशी माहिती शिवाजीनगर आगार व्यवस्थापकाकडून देण्यात आली.
दसरा-दिवाळी सण येताच नोकरी, उद्योग-व्यवसाय, शिक्षणासाठी पुण्यात आलेले नागरिक मोठ्या संख्येने गावी जातात. यावेळी शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होते. यावेळी राज्य परिवहन विभागाकडून जादा बसचे नियोजन करून अगाऊ तिकीट बुकिंग केले जाते. त्यानुसार शिवाजीनगर आगराच्या वतीने मराठवाडा, खान्देश, विदर्भ या ठिकाणी सर्व मार्गावर प्रवाश्यांना गावी जाण्यासाठी दि. 7 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी येथून सोडण्यात येणार आहेत. येथून जवळपास 500 जादा बस सोडण्यात येणार आहेत.
याठिकाणी करा ऑनलाईन तिकीट बुकिंग
तसेच बसस्थानक, महामंडळाद्वारे नियुक्त अधिकृत बुकिंग एजंट, रेडबस, पेटीएम, मेक माय ट्रिप, मेझॉन पे, याद्वारे आपले तिकीट बुक करू शकता. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी येथून आरक्षणाकरिता उपलब्ध असलेल्या बसेसचे तिकीट बुक करण्यासाठी PUNECNT या सांकेतिक कोडचा वापर करावा.