वाघोली गावच्या सामाजिक, राजकीय व विकासाच्या घडामोडीत सदैव अग्रेसर असलेला नेता. सरपंच ते जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत मजल मारत समाजाभिमुख कामगिरीतून समाजात आपला वेगळा ठसा उमटविणारे वाघोलीचे विकासाभिमुख नेतृत्व…
भाऊंच्या सामाजिक कार्याचा आढावा
दोन वर्षांपासून करोनाचा प्रादुर्भावाची लाट ये-जा करीत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, समाजातील अनेक दानशूर मंडळी तसेच समाजसेवी संस्था व लोकप्रतिनिधी पुढाकार घेत होते. करोना काळात नागरिकांच्या सेवेसाठी अविरतपणे रामभाऊ दाभाडे कार्य केले असून ते अद्यापही सुरूच आहे. रामभाऊंचे हे कार्य समाजाला एक प्रेरणादायी असल्यामुळे नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
कोविड सेंटरमधून जपले वाघोलीकरांचे आरोग्य…
हवेली तालुक्यामधील जास्तीत जास्त रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रामभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतून खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 3 मे 2021) सकाळी शासकीय नियमांचे पालन करून आमदार ॲड.अशोक पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडला. हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारून वाघोलीकरांचे आरोग्य जपत करोना काळात नागरिकांना दिलासा दिला. त्यांच्या सहकार्यामुळे सामान्य नागरिकांचा भाऊंवरचा विश्वास दृढ झाला आहे. वाघोलीमधील एक सामान्य कार्यकर्ता सरपंच पदापासून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदापर्यंत मजल मारत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून एक उत्तम मार्गदर्शक म्हणून सदैव पाठीशी उभे राहात असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे नागरिक आवर्जुन सांगतात.
करोना मुक्तीसाठी रामभाऊंचा पुढाकार…
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वाघोली परिसरातील ज्या भागात बाधित आढळून येत होते, त्या भागात नागरिकांना रामभाऊ दाभाडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन दिलासा देण्याव्यतिरिक्त तो भाग निर्जंतुकीकरण करणे, तसेच वेळोवेळी नागरिकांना धीर देणे याकामी त्यांना ग्रामपंचायत व दानशूर व्यक्तींची त्यांना मोलाची साथ लाभली. आपल्या भागातील नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या हेतूने देखील भाऊंनी योग्य ती पावले उचलून आपले वेगळेपण वेळोवेळी सिद्ध केले.
नागरिकांना मास्क वाटप …..
वाघोलीमधील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या हेतूने जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांना रामभाऊ दाभाडे मित्र परिवाराच्या वतीने तसेच रामभाऊ दाभाडे प्रतिष्ठान यांच्यावतीने मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
परप्रांतीयांचा प्रवास केला सुखकर…
पुणे शहरांमधून तसेच पुण्याच्या इतर भागांमधून रात्री-अपरात्री परराज्यात जाण्यासाठी नागरिकांनी पायी प्रवासाचा मार्ग स्वीकारला होता. या कालावधीत वाघोली परिसरामध्ये आलेल्या नागरिकांना तातडीने त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठी एक सामाजिक जाणीव ठेवून रामभाऊ दाभाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अल्पोपहार, जेवण तसेच त्यांना शासकीय यंत्रणेकडून पास मिळवून देण्याकामी मोलाची कामगिरी करून परराज्यात जाण्याचा मार्ग त्यांचा मार्ग सुखकर केला होता.
16 हजार नागरिकांना मोफत किराणा
रामभाऊ दाभाडे मित्र परिवाराच्या सहकार्यातून रुबीकॉन फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 10 हजार नागरिकांना तर पहिल्या लाटेत रामभाऊ दाभाडे मित्र परिवार व इतरांच्या वतीने 6 हजार नागरिकांना मोफत किराणा साहित्य वाटप करून भाऊंनी सामाजिक बांधिलकी जोपासली. याकामी वाघोलीतील वाघेश्वर तरुण मंडळ, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था, तसेच रामभाऊ दाभाडे मित्र परिवार यांचे मोलाचे योगदान लाभले. याशिवाय रामभाऊ दाभाडे मित्र परिवार व वाघेश्वर तरुण मंडळ यांच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त दि. 1 ते 6 जून 2020 कालावधीत रामदास (भाऊ) दत्तात्रय दाभाडे (माजी सरपंच वाघोली, माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे) यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी वाघोलीमधील गरीब कुटुंबांना व बांधकाम मजुरांना पाच हजार (50 टन- गहू व तांदूळ) अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले होते.
कामगारांची भूक भागविली
वाघोली आणि पंचक्रोशीमध्ये बांधकाम क्षेत्राची संख्या जास्त आहे. या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना लॉकडाऊनमुळे एक वेळच्या जेवणाचीदेखील अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने रामभाऊ दाभाडे यांनी पुढाकार घेऊन वाघोलीमधील गोरगरीब, गरजू कामगारांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये जवळपास 12 हजार लोकांना दररोज अन्नदानाचा कार्यक्रम करोना काळामध्ये रामभाऊ दाभाडे यांनी यशस्वी उपक्रम राबवून नागरिकांची भूक भागविली होती.
भाऊंची सामाजिक कार्ये –
– शब्दांकन : दत्तात्रय गायकवाड(हवेली तालुका प्रतिनिधी)