तू चाल पुढं तुला र…
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची…
हे गाण आता आठवण्याचे कारणही तसेच आहे, करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सगळेचजण मेटाकुटीला आले होते. सुरुवातीला फक्त शहरी भागांमध्ये पसरणाऱ्या करोनाने नंतर ग्रामीण भागात आपले पाय घट्ट रोवले होते. या काळात करोडो हात मदतीला आले; मात्र तरी ते कमीच पडत होते. तरी काहीही झाले तरी हाताची घडी घालून गप्प बसायचे नाही. त्यासाठी आवश्यकता होती ती एकजूट होण्याची, तसेच सगळ्यांना योग्य दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाची आणि त्यातून नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि मानसिक आधार देणाऱ्या हातांची. याचे मूर्तिमंत उदाहरण ठरले होते ते म्हणजे राजगुरूनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. देविदास शिंदे-पाटील यांची नागरिकां प्रति असलेली बांधिलकी!
अल्पावधी आणि करोनाच्या संकटात ॲड. देविदास शिंदे पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळताच राजगुरूनगर वकील बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड यांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करून आपल्या सामाजिक कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. न्यायालयातील कामकाजाबरोबर वकील बारच्या कार्यकारिणीला बरोबर घेत न्ययाधीश व ज्येष्ठ वकिलांचे मार्गदर्शन घेऊन तालुक्यात कायद्याचा जागर घातला. जिल्ह्यात राजगुरूनगर बार असोशिएशनचे नाव पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले.
ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा. एक आदर्श असे त्यांचे एकत्र कुटुंब आहे. कुटुंबात जवळपास 100 माणसे असून गुण्या गोविंदाने राहत असून हा जगापुढे त्यांनी आदर्श घालून दिला आहे. एका प्रगतशील कुटुंबात ऍड. देविदास शिंदे-पाटील यांचा जन्म 11 एप्रिल 1980 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण 7 वीपर्यंत गावातच झाले. 8 ते 12 पर्यंत दावडी येथील फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झाले. कायद्याचे शिक्षण त्यांनी पुण्यात सिंम्बॉयसीस कॉलेज व यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयात पूर्ण केले.
सन 2006 मध्ये ॲड. देविदास शिंदे-पाटील यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. सन 2014 मध्ये राजगुरूनगर वकील बार असोशिएशनच्या उपाध्यक्षपदावर यशस्वी काम केले. सन 2021 मध्ये त्यांची राजगुरूनगर वकील बार असोशिएशनच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवड झाली. देविदास शिंदे-पाटील यांचे वडील युवराज राजाराम शिंदे पाटील यांनी श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा यात्रा कमिटी, जयमल्हार व्यवस्था मंडळावर काम केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेत करीत असून एक प्रगतशील शेतकरी आहेत. ऍड. देविदास शिंदे यांचे चुलते कै. लक्ष्मण राजाराम शिंदे-पाटील हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक होते. तालुक्यातील एक आदर्श कुटुंब म्हणून निमगावच्या या शिंदे कुटुंबाकडे पहिले जाते.
राजगुरूनगर वकील बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत खेड तालुक्यातील नागरिकांना विविध कायदेविषयक माहिती व्हावी म्हणून पुढाकार घेत राजगुरूनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. देविदास शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात नावलौकिक मिळवला आहे. न्यायालयास सहकार्य करीत राष्ट्रीय लोक अदालत, करोना काळात राजगुरूनगर न्यायालयातील वकील, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार यांच्यासाठी न्यायालयात तब्बल 8 लसीकरण शिबिरांचे आयोजन केले. खेड न्यायालयातील वकील, न्यायालयातील न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बारच्या सर्व कार्यकारिणीचे त्यांना सहकार्य मिळाल्याने उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहे.
लॉकडाऊनमध्ये विशेष काम
करोनाचे संकट असतानाही त्यातून नवीन म्हणजे नवीन वकिलांवर मोठे संकट कोसळले. लॉकडाऊनच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली. त्यावर मात करीत स्वखर्चातून नवीन वकिलांसाठी किराणा किट, सॅनिटायझर, मास्क वाटपासह आवश्यक ती मदत केली आणि सामाजिक बांधिलकी जोपासली. करोनाच्या काळातच अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी वकील बांधवांसाठी विविध उपक्रम घेत करोनावर मात करण्यासाठी जनजागृती केली.
अध्यक्षपदाची धुरा उत्कृष्टपणे निभावली
आपल्या आई-वडिलांचे संस्कार सामाजिक बांधिलकी सांभाळत गेली अनेक वर्षांपासून खेड न्यायालयात वकील म्हणून ॲड. देविदास शिंदे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. न्यायालयात काम करताना पक्षकारांचे समाधान आणि त्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच आपल्या अशिलाला एक संधान निर्माण होईल असे काम ॲड. देविदास शिंदे करीत आहेत. काम करताना अनेक अडचणींचा सामना करीत अध्यक्ष ॲड. देविदास शिंदे यांनी राजगुरुनगर वकील बार असोशिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी उत्कृष्टपणे निभावली आहे. राजगुरूनगर जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश यांच्यासह ज्येष्ठ वकील सहकारी वकील यांचे मोठे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
आजादी का अमृतमहोत्सव…
आजादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत खेड तालुक्यात विविध गावांमध्ये 44 कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले यामध्ये अध्यक्ष म्हणून ॲड. देविदास शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सर्व न्यायाधीश आणि वकील बार असोशिएशनचे सर्व संचालक, सदस्य-सभासद यांच्या सहकार्यातून तालुक्यात 44 कायदेविषयक शिबिरे घेण्यात आली. या शिबिरात खेड न्यायालयातील मान्यवर न्यायाधीश यांसह वकिलांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. याबरोबरच न्यायालयात येणाऱ्या विविध ठिकाणच्या पक्षकारांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
सदस्यांसह व्हॅक्सिन मोहीम राबविली
लॉकडाऊनच्या काळात वकील बांधवांना सेवा सुविधा पुरवण्याबरोबरच वकील, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी यांच्यासाठी तब्बल 8 वेळा कोविड लसीकरणाची शिबिरे घेतली. मुख्य न्यायाधीश यांसह सर्व न्यायाधीशांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले. वकील बारचे अध्यक्ष ॲड. देविदास शिंदे यांनी आपल्या कार्यकारिणीच्या सदस्यांसह व्हॅक्सिन मोहीम राबविली. राज्यभरातील पक्षकार येथील न्यायालयात येत असत त्यांना कोविडचे नियम पाळत न्यायालयास सहकार्याची भूमिका घेत काम केले. जिल्ह्यात 8 वेळा न्यायालयात व्हॅक्सिन शिबिरे घेऊन करोनावर मात केली.
फोटो गॅलरी –
राष्ट्रीय लोकअदालतला उत्स्फूर्त प्रतिसाद
लॉकडाऊन उठल्यानंतर न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर राष्ट्रीय लोकअदालत घेत प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याचे धोरण सरकारने राबविले. लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे मिटवण्यासाठी ॲड. देविदास शिंदे यांनी सर्व वकील बांधवांना बरोबर घेत चर्चा, बैठका घेत वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. या लोकअदालतमध्ये जवळपास 56 व्यक्ती असलेला वाटपाचा दावा तडजोडीने सोडविण्यात आला होता. बॅंक रिकव्हरी, चेक बाउंस, घरपट्टी, पाणीपट्टी, भूसंपादन, मोटार अपघात, दिवाणी व फौजदारी खटले यात तडजोडी होऊन अनेक खटले मिटले तर मिळालेल्या खटल्यातून करोडो रुपयांची वसुली झाली. येथील न्यायालयाचे सर्व न्यायाधीश वकील यांच्यातील समन्वय आणि सहकार्य असल्याने लोकअदालत यशस्वी झाले आहे.
सदस्यांसह व्हॅक्सिन मोहीम राबविली
लॉकडाऊनच्या काळात वकील बांधवांना सेवा सुविधा पुरवण्याबरोबरच वकील, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी यांच्यासाठी तब्बल 8 वेळा कोविड लसीकरणाची शिबिरे घेतली. मुख्य न्यायाधीश यांसह सर्व न्यायाधीशांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले. वकील बारचे अध्यक्ष ॲड. देविदास शिंदे यांनी आपल्या कार्यकारिणीच्या सदस्यांसह व्हॅक्सिन मोहीम राबविली. राज्यभरातील पक्षकार येथील न्यायालयात येत असत त्यांना कोविडचे नियम पाळत न्यायालयास सहकार्याची भूमिका घेत काम केले. जिल्ह्यात 8 वेळा न्यायालयात व्हॅक्सिन शिबिरे घेऊन करोनावर मात केली.
शब्दांकन – रामचंद्र सोनवणे (खेड तालुका प्रतिनिधी)